मुर्धा गावाच्या या मंदिरामध्ये श्री रामनवमी व हनुमान जयंती हे यात्रोस्तव , अखंड हरीनाम सप्ताह , होळी हे उत्सव साजरे केले जातात .
गावाच्या विस्तारानुसार पश्चिमेकडील हे श्री राम मंदिर, गावाच्या दक्षिणेकडील बाजूस गावदेवी मंदिर ज्यात गावाचे रक्षणकर्ती गावदेवी, क्षेत्रपाल किवा रक्षणकर्ता म्हणून हासमोळ्या देव तर गावाच्या पूर्वेकडील बाजूस ब्राम्हणदेवाचे मंदिर आहे . आज हि गावातून लग्न समारंभ तीर्थक्षेत्र या ठिकाणी प्रवास सुरु करताना ब्राम्हण देवाला श्रीफळ व हार देवून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे . गावाच्या रक्षणामध्ये या सर्व देवाचा मोठा वाटा आहे . या मंदिराप्रमाणेच गावात अनेक खाजगी मंदिरे सुद्धा असून मंदिराचा गाव अशी मुर्धा गावाची ओळख आहे
गावाच्या इतिहासानुसार शके १७४० मध्ये साध्या कौलारू वास्तूत राम मंदिराची स्थापना झाली होती . शके १८३० मध्ये या मंदिराचा प्रथम जिर्णोधार गावातील लोकांनी केला होता . गावपंच मंडळाच्या स्थापने नंतर इ. स. १९८५ मध्ये मंदिराचा दुसऱ्यांदा जिर्णोधार करण्यात आला .
मात्र त्यानंतरच्या काही वर्षानंतर मंदिरामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होते. पण त्यापेक्षा तुंगारेश्वर येथील बाबांनी उभारलेल्या मंदिराप्रमाणे आपलेही श्री राम मंदिर उभारावे हि कल्पना गावपंच मंडळाच्या सदस्यांनी मांडली व आज ती कल्पना बाबांच्या आशीर्वादाने लोकसहभागातून व असंख्य देणगीदारांच्या मंद्तीतून हे भव्य श्री राम मंदिर उभारले गेले .
आपणासमोर साकारलेल्या या मंदिराच्या वास्तूची शैली हेमाडपंथी असून बंशी पाषाणात पूर्ण मंदिर साकारलेले आहे. या श्री राम मंदिराच्या जीर्णोधाराचा शुभारंभ श्रावण कृष्ण सप्तमी म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी झाला म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २००९ रोजी मंदिराचा भूमिपूजन व कोनशीला समारंभ सर्वांच्या उपस्थितीत पार पडला व मंदिराच्या कामाची यशस्वी सुरुवात झाली
मंदिराची रचना हि धर्मशास्त्राप्रमाणे व्हावी असा गावपंच मंडळाचा विचार होता. त्यामुळे गर्भग्रुहचि आखणी करताना नाभी केंद्र ठरवण्यात आले व विधीपूर्वक शिलान्यास समारंभ करून नाभी पाइप जमिनीच्या आत ३० फुट खोलपर्यंत बसवण्यात आला . या नभी केंद्रापासून प्रभू श्री रामाची मूर्ती हि नाभी पाईपचे २८ भाग करून ८ व्या भागात बसवण्यात आली आहे.
इतिहासानुसार इ. स. १२ व्या हेमांडपंथी मंदिर बघण्यास सुरुवात झाली होती . पण आज २१ व्या शतकात हे हेमांडपंथी मंदिर उभारताना त्याप्रमाणेच उभारावे यासाठी तशीच रचना करण्यात आली . अगदी मंदिराच्या पायऱ्या विषम संख्येत उभारून त्या ७ करण्यात आल्या आहेत . तर मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूस पायऱ्या ठेवण्यात आल्या आहेत त्याला भुजा असे म्हणतात. इतिहासानुसार इ. स. १२ व्या हेमांडपंथी मंदिर बघण्यास सुरुवात झाली होती . पण आज २१ व्या शतकात हे हेमांडपंथी मंदिर उभारताना त्याप्रमाणेच उभारावे यासाठी तशीच रचना करण्यात आली . अगदी मंदिराच्या पायऱ्या विषम संख्येत उभारून त्या ७ करण्यात आल्या आहेत . तर मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूस पायऱ्या ठेवण्यात आल्या आहेत त्याला भुजा असे म्हणतात. मंदिराचा सभामंडप हा भव्य दिव्य असा साकारण्यात आला आहे . हा सभामंडप ५१ फुट लांब व २७ फुट रुंद असून भिंतीवर रामायणातील शिल्प दृश्ये साकारली आहेत. या प्रभू श्री रामाच्या मंदिरात प्रत्यक्ष रामायण आपल्या नजरेसमोर चित्ररुपात उभे राहते . सभामंडपात प्रवेश करताना डाव्या बाजूला शितलादेवी व लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती असून उजव्या बाजूला शिवलिंग आहे . तर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती तर उजव्या बाजूला मारुतीरायाची मूर्ती आहे. तर गर्भगृहात मधोमध राम पंचायतन म्हणजे प्रभू श्री राम , लक्ष्मण , सीतामाई व दास हनुमान यांच्या मूर्ती आहेत . हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी या सर्व मूर्तीची भव्य मिरवणूक गावात काढण्यात आली होती . सतत चार दिवस सर्व धार्मिक विधी मंगलमय वातावरणात मंदिरात सुरु आहेत .
आपण चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी परमपुज्य बाबांच्या हस्ते शिखर कलश स्थापना, ध्वजारोहण व श्री ची प्राणप्रतिष्टापना होणार आहे . मंदिराचे दर्शन होते ते त्याच्या कळसावरून मुर्धा गावात उभारलेले श्री राम मंदिर हे पंचक्रोशीतील भव्य - दिव्य मंदिर आहे . हेमांडपंथी रचनेतील या मंदिरावर एकूण तीन कलश असून सर्वात मोठा कलश ५ फुटाचा आहे तर मंदिराच्या ध्वज हा ५१ फुट उंच असून फक्त ध्वजादंड १६ फुट उंच असून तो पूर्ण तांबा या धातूपासून बनवला आहे .
एकंदरीत आगरी समाजाचे पूर्ण पंचक्रोशीमधील हे प्रभू श्री
रामाचे मंदिर भव्य - दिव्य असून लोकसहभागातून उभारलेले आहे .
मंदिराच्या समोर उभी असलेली दिपमाळ हि पूर्ण दगडी असून तीर्थक्षेत्रीच
पाहायला मिळणारी दगडी दिपमाळ मुर्धा गावाचे वैशिष्ट्य आहे पूर्ण
पंचक्रोशीत असणारी हि एकमेव दगडी दिपमाळ आहे . मंदिराच्या बाजूला
असणारा पिंपळाचा पार ज्याला शतकाची परंपरा आहे .
मुर्धा गावाच्या या मंदिरामध्ये श्री रामनवमी व हनुमान जयंती हे यात्रोस्तव , अखंड हरीनाम सप्ताह , होळी हे उत्सव साजरे केले जातात . गावाच्या विस्तारानुसार पश्चिमेकडील हे श्री राम मंदिर, गावाच्या दक्षिणेकडील बाजूस गावदेवी मंदिर ज्यात गावाचे रक्षणकर्ती गावदेवी, क्षेत्रपाल किवा रक्षणकर्ता म्हणून हासमोळ्या देव तर गावाच्या पूर्वेकडील बाजूस ब्राम्हणदेवाचे मंदिर आहे . आज हि गावातून लग्न समारंभ तीर्थक्षेत्र या ठिकाणी प्रवास सुरु करताना ब्राम्हण देवाला श्रीफळ व हार देवून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे . गावाच्या रक्षणामध्ये या सर्व देवाचा मोठा वाटा आहे . या मंदिराप्रमाणेच गावात अनेक खाजगी मंदिरे सुद्धा असून मंदिराचा गाव अशी मुर्धा गावाची ओळख आहे .
We believe that its very light version & Simple, Creative & Flexible Design with Standards
Mukesh Prabhakar Patil